विजेच्या तारेला चिटकला तरुण ! प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

Youth gets stuck in electric wire असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो.

 

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीच गर्दी प्रत्येक मुंबईकराला सांभाळून घेते, वेळ प्रसंगी कुणाच्याही मदतीला उभी राहते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होतोय. यामध्ये एका तरुणाला ओव्‍हरहेड वायरचा शॉक लागला, मात्र मुंबईकरांनी त्याला कसं वाचवलं तुम्हीच पाहा.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण स्टंटबाजी करताना ओव्‍हरहेड वायरला चिकटला.

मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण लोकलच्या डब्यावर पडलेला दिसत आहे, यावेळी काही प्रवाशांनी त्यांला ओढणीच्या मदतीने खाली काढले. शॉक लागल्यामुळे त्याला बरंच भाजलेलं दिसत आहे मात्र प्रवाशांमुळे त्याचा जीव वाचला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.