State bank

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं ?

तुमच्या घराच्या जवळील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये / SBI बँकेत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडता येऊ शकतं. तेथील कर्मचाऱ्याच्या मदतीनं तुम्ही खाते उघडू शकता. खातं उघडण्याआधी तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवरून त्यासंबंधीचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.

अर्जातील सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक ती महत्वाची कागदपत्र त्याला जोडावी लागतील. ओळखपत्र बंधनकारक आहे. मुलीचा आधार कार्ड, जन्मदाखला पत्ता म्हणून वापरता येईल.

ही सर्व कागदपत्रं अर्जासोबत जोडल्यानंतर ते पोस्ट ऑफिसकडे सुपूर्द करा.

अर्जासोबत खाते उघडण्याची किमान रक्कम द्या. ही रक्कम, रोख, चेक किंवा ड्राफ्टच्या स्वरूपात देऊ शकता.

या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा देण्यात आलीय. पोस्ट ऑफिस, खासगी व सार्वजनिक बँकेत यासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे.

हे बचत खातं अधिकृत बँकेत उघडलं जाऊ शकतं. तसंच, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खातं ट्रान्स्फर करण्यासंबंधी फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईनही उपलब्ध आहेत.

अटी आणि नियम काय आहेत?

जर सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात किमान रक्कम 250 रुपये डिपॉझिट केली नाही, तर अकाऊंट ‘डिफॉल्ट अकाऊंट’ म्हणून ग्राह्य धरला जाईल. मात्र, हे अकाऊंट 250 रुपये भरून पुन्हा सुरू करता येईल. मात्र, त्यासोबत अधिकचे 50 रुपये भरावे लागतील.

जिच्या नावाने अकाऊंट आहे, त्या मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: अकाऊंट हाताळू शकते. 18 वर्षांनंतर अकाऊंट मुदतपूर्वी बंदही करता येऊ शकतं.

अत्यंत महत्वाचं आणि तातडीचं कारण असल्यास अकाऊंटमधून आधीही पैसे काढता येऊ शकतात. मात्र, यासाठी काही नेमकी कारणंच ग्राह्य धरली जातील.

मुदतपूर्व अकाऊंट तेव्हाच बंद करता येईल, जर गंभीर आजाराचं कारण असेल किंवा वैद्यकीय गंभीर कारण असेल.