aadhaar sim

आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह आहेत?
टेलिकॉम विभागाच्या sancharsaathi.gov.in साईटचा वापर करून तुमच्या आधार कार्डवरील अ‍ॅक्टिव्ह सिमची संख्या जाणून घेता येईल. तसेच संशयास्पद सिम अ‍ॅक्टिव्ह आढळल्यास ते ब्लॉक करून त्याची तक्रार करण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

 

इथे क्लिक करून पहा

 

संशयास्पद सिम कसे डिअ‍ॅक्टिव्ह कराल?
आधी sancharsaathi.gov.in जा.
होम पेजवर Citizen Centric Services अंतर्गत Know Your Mobile Connections वर टॅप करा.
आपला मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरा.
नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. ते भरून पुढे जा.
आता तुम्हाला आधार कार्डवर घेतलेल्या सर्व सिमकार्डचा तपशील मिळेल.
एखादा नंबर संशयास्पद वाटल्यास ‘Not required’ वर क्लिक करून त्याची माहिती देऊ शकता.
सिमकार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट होण्यासाठी काही दिवस लागतात. सिम ब्लॉक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

9 पेक्षा जास्त सिम अ‍ॅक्टिव्हेट केल्यास दंड
नव्या टेलिकॉम कायद्याच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डवर फक्त 9 सिम चालू ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त सिम अ‍ॅक्टिव्ह आढळल्यास 50 हजार ते 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.